{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1614867573651,"A":[{"A?":"I","A":64.88938580761123,"B":53.99999999999997,"D":167.3793068349274,"C":51.43109610018678,"a":{"B":{"A":{"A":"MAEShmGycjo","B":1},"B" 
विदर्भ

थरार! मुलीला शून्य गुण का दिले म्हणून महाविद्यलयात काँग्रेसच्या महासचिवांचा आत्मदहनाचा प्रयत्न

राजेश चरपे

नागपूर ः दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीला थेअरीच्या आठपैकी सात विषयात शून्य गुण दिल्यामुळे संतप्त झालेले वडील आणि काँग्रेसचे महासचिव जिया पटेल यांनी गुरुवारी (ता.४) महाविद्यालयात अंगावर पेट्रोल शिंपडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने खळबळ माजली आहे.

जिया पटेल यांची मुलगी रुझैयना पटेल ही दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालयात अंतिम वर्षाला शिकते. तिला थेअरीच्या आठपैकी सात विषयात शून्य गुण दिल्यामुळे संतप्त झालेल्या पटेल यांनी आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले.

ऑक्टोबर २०२० मध्ये परीक्षा झाली होती. १९ डिसेंबर २०२० ला निकाल आला होता. फेरमूल्यांकन तारीख २६ डिसेंबर होती. हा सर्व सोपस्कार करून ८ जानेवारी २०२१ ला निकाल आला. त्यात रुझैयनाला अनुपस्थित असल्याचे कारण देत महाविद्यालयाने अंतर्गत शून्य गुण दिले होते. त्याविरोधात जिया पटेल यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली. 

पटेल यांच्या मुलीला हृदयाचा दुर्मिळ आजार आहे. असा आजार असलेल्यांची अतिरिक्त परीक्षा घेण्याची तरतूद विद्यापीठ कायद्यात आहे. त्या नुसार उच्चन्यायालयाने रुझैयना पटेल हिची अतिरिक्त परीक्षा घेण्याचे आदेश दिले. तिची अतिरिक्त परीक्षा घेऊन नवी गुणपत्रिका विद्यापीठाकडे पाठविण्यात यावी, असे आदेश उच्चन्यायालयाने दिले. त्या नुसार २८ फेब्रुवारी ते ४ मार्च अशी तिची एकटीची परीक्षा घेण्यात आली. पण, तिची मार्कशिट विद्यापीठाकडे पाठवण्यास महाविद्यालयाने नकार दिला.

येत्या आठ मार्च २०२१ रोजी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आहे. त्यांच्या निकालासोबत आपल्या मुलीचेही गुण आणि गुणपत्रिका पाठवण्यात येईल, अशी भूमिका दंत महाविद्यालय प्रशासनाने घेतली. त्यावर या परीक्षेशी आमच्या मुलीचा काहीही संबंध नाही आणि असेच करायचे होते तर तिची एकटीची परीक्षा का घेतली असे म्हणत पटेल यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्या नंतर डीन बर्फीवाला यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर पटेल यांच्या मुलीची गुणपत्रिका तयार करून विद्यापीठाकडे पाठवण्यात आली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT